Monday, November 21, 2016

द्रष्टाभाव - साभार

  चित्तात क्रियाशील ईश्वर शक्तीचे वेगळेपन अनुभवास आल्यामुळे आणि वेगळेपणा नसल्याच्या भ्रमामुळेच,जीवाच्या सर्व समस्या डोके वर काढू लागतात या वेगळे पणाच्या अनुभवालाच शक्ति जागृती म्हटले जाते,त्यास गुरुकृपेची आवश्यकता असते।चित्ताहुन शक्ति भिन्न आहे या अनुभवाबरोबरच,चित्ताच्या आधारावर शक्तीचे कार्य,त्याद्वारे संस्कार संचय, प्रारब्ध निर्मिति,उदय होणाऱ्या वासना व् वृत्ती भाव आणि संकल्प हे सर्व काही चित्तपेक्षा वेगळे जाणवू लागते।याप्रकारे चित्त,शक्ति व् चित्तावर होणारे परिणाम या सर्वांचा द्रष्टा साधक अर्थात जीव बनतो। कल्पना करा ही स्थिति संसारी जीवांच्या तुलनेत किती वेगळी आहे।जेव्हा कोणी समस्यांना,चिंताना वेगळे पाहतो तेव्हा दृष्याची स्थिति अशी होते जणू एखादे चलचित्र पहात आहे।तो चिंतामुक्त होतो।


     यात अडचण ही आहे की साधक हा भाव स्थिर राखु शकत नाही,केवळ साधन काळात हा भाव निर्माण होतो।कित्येकदा तर साधन समयीसुद्धा,जेव्हा चित्ताचे संस्कार जागृत होऊन क्रिया रूप धारण करतात,साधक द्रष्टा भावाचा त्याग करून कर्ता भाव धारण करतो व् स्वतःला चिन्तानमधे बुडवून घेतो।साधनेतून उठल्यावर तर द्रष्टाभावाला तिलांजली देतातच आणि शुद्ध संसारी रुपात आसक्त होऊन वावरतात।काहीही असो,शक्ति जागृती नंतर आशेची,प्रकाशाची एक झलक तर देतेच् देते।जीवनाची दिशा बदलणे आरंभ होते।तमाची तमारुपात जाणीव होऊ लागल्यावर प्रारब्धरूपी भिंतीच्या वीटा खिलखिल्या होऊ लागतात हेच गुरुशक्तीचे महात्म्य आहे,कृपा आहे।

No comments:

Post a Comment