Monday, November 21, 2016

वैराग्य विचार


🔅 भोग हे मेघसमूहात  चमकणार् या विद्युल्लते प्रमाणे  चंचल आहेत .आयूष्य वायूने विस्कळीत केलेल्या अभ्रपटलातील उदकाप्रमाणे क्षणभंगूर आहे , आणि प्राण्यांनी  तारुण्यावर ठेवलेले भरवसेही चंचल आहेत असा विचार मनात आणून  द्न्यातेहो , धैर्य आणि समाधीसिध्दी इहींकरून  सुलभ असा जो योग  त्याविषयी बुध्दी धरा  .
🔅 आयुष्य पाण्याच्या लहरींप्रमाणे चंचल आहे , तारुण्याची शोभा काही दिवस राहणारी , अक्षयी नव्हे .विषय हे मनातील संकल्पाप्रमाणे  क्षणभंगूर होत. भोगांचे समुदाय पर्जन्यकाळच्या  विजेप्रमाणे  चंचल आहेत .
यास्तव या संसारभवसमुद्राप्रत तरून जाण्याकरिता परब्रह्मी चित्त स्थिर करा .
🔅 भोगांची स्थिती क्षणभंगूर असून या भोगांमुळेच हा प्रपंच झाला आहे ; तस्मात लोकहो , अशा विषयासाठी व्यर्थ का फिरता ? तर आता हा खटाटोप पुरे करा  आणि जर माझ्या वचनावर विश्वास असेल तर मी सांगतो तसे करा . आशारूपी अनेक पाशांतून  मुक्त झाल्यामुळे  स्वच्छ झालेले चित्त कामोच्छेदास कारणभूत असे जे आत्मस्वरूप त्याचे ठायी  दृढ करा म्हणजे कृतार्थ व्हाल .
🔅 ज्याठिकाणी स्थित झालेला प्राणी ब्रह्मा , इंद्र आणि मरुद्गण  इत्यादिकास तृणवत मानितो , आणि ज्याच्या लोभेकरून त्रैलोक्य राज्यादिक मोठमोठ्या समृध्दीही तत्काल विरस होतात , म्हणजे रुचत नाहीत  असा तो ब्रह्मद्न्यानरूपी बोध तोच एक नित्य प्रकाशमान असा शोभत आहे . तर हे सद् गृहस्थ  या बोधाहून इतर जो क्षणभंगूर भोग  त्याच्या ठिकाणी  तू सक्त होऊ नकोस.

💢संग्रहित 

No comments:

Post a Comment