Monday, November 21, 2016

आसने व प्राणायाम

योगासने व प्राणायाम

पोटावरील आसने 
१)भुजंगासन
२)शलभासन
३)धनुरासन 
(नौकासन
शयनस्थितीतील आसने
(द्विपाद  उत्तानासन
(विपरीत करणी
(सर्वांगासान
(मत्स्यासन
(हलासन
(१०नौकासन
(११पवनमुक्तासन
(१२शवासन
बैठक स्थितीतील आसने
(१३पद्मासन
(१४आकर्ण धनुरासन
(१५वक्रासन
(१६वज्रासन
(१७पश्चिमोत्तानासन
दंडस्थितीतील (उभ्या स्थितीतीलआसने
(१८वृक्षासन
(१९वीरासन
(२०तिकोणासन
(२१शीर्षासन

प्राणायाम 
भ्रामरी
मूर्च्छा
प्लाविनी
  योगासने
यातील मूळ शब्द योग  आसनेयोग’ हा शब्द मूळ संस्कृत धातू युज्’ म्हणजे जोडणे यापासून तयार झाला आहेत्यात अनेक संकेत आहेतजीवात्मा  परमात्मा यांचा योगहा योग साधण्यासाठी चंचल असलेल्या मनावर विशेष नियंत्रण आणावे लागतेत्यास योग म्हणतातचित्तवृत्तींचा निरोध’ अशी योगाची व्याख्या करतातचित्तवृत्तींच्या पूर्ण निग्रहाने सविकल्पक  निर्विकल्पक समाधी साधता येतेसमाधी म्हणजेच योग होयहे योग्याचे जीवनध्येय असते. [ योगयोगदर्शन].
योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट प्रकारची स्थिती ठेवणे  त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होयम्हणून स्थिरसुखं आसनम्’ (स्थिर  सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसनअशी आसनाची व्याख्या योगसूत्रांत केली आहेशुद्ध मन नसलेले शरीरस्थिर बुद्धी नसलेले शरीर कोणतेही महत्त्वाचे कार्य यशस्वी करू शकणार नाहीस्वस्थ  व्याधिमुक्त शरीराशिवाय मनावर नियंत्रण आणता येणार नाही.
योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जातेत्यांना योगासने’ म्हणतातयोगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यमनियमआसन प्राणायामप्रत्याहारधारणाध्यान  समाधी होतयास अष्टांगयोग म्हणजे आठ अंगे असलेला योग असे म्हणतातसुखावह स्थिरपणाने (कोणतीही हालचाल  करता शांत चित्ताने एखाद्या विशिष्ट स्थितीत दीर्घकाल राहता आलेम्हणजे ते आसन’ साध्य झालेअसे म्हणता येईलतसेच कोणत्याही शारीरिक बैठकीत किंवा स्थितीत सुखावह  यातनाविरहित रीतीने मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र  एकाग्र राहता येणेहे आसनांच्या अभ्यासाने साधले पाहिजेत्याकरिता एकूण शारीरिक स्वास्थ्य टिकून राहणे जरूरीचे आहेशरीरातील विविध इंद्रिये  संस्था - उदा.श्वसनरक्ताभिसरणपचनउत्सर्जन तसेच स्नायूसमूहज्ञानतंतूमन यांसारखे घटक या सर्वांची कार्यक्षमता  परस्परसहनियमन यांचा विकास व्हावा लागतो  तो योगासनांच्या नित्य सरावातून साधता येतोयोगासनांच्या विविध स्थितींमुळेहालचालींमुळे पाठीचा कणा (मेरुदंडआणि त्यातील पृष्ठवंशरज्जू अर्थात मज्जारज्जूज्ञानतंतूमज्जापेशी यांच्यावर इष्ट परिणाम होतो.
योगासने साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून मुला-मुलींनी करण्यास प्रत्यवाय नाहीयोगासने करण्यासाठी प्रातःकाल फार चांगलातथापि सायंकाळीही ती करण्यास हरकत नाहीयोगासनांसाठी जागा शांतस्वच्छहवेशीर  मनास प्रसन्न वाटेल अशी असावीआसने अनशापोटी शक्यतो करावीतअथवा पेय घेतल्यास किमान अर्धा तास तरी जाऊ द्यावाजेवणानंतर किमान चार तास जाऊ द्यावेतमात्र आसनांनंतर अर्ध्या तासाने जेवण घेण्यास हरकत नाहीआसने करताना स्वच्छहलकेसैलसर  आवश्यक तेवढेच कपडे घालावेत प्रकारचे नियम सर्वसामान्यपणे सांगितले जातातविशिष्ट प्रकारच्या आजारातव्याधिग्रस्त व्यक्तींनीत्या त्या आजारात अपायकारक ठरणारी आसने करू नयेतस्त्रियांनी योगासने करण्यास काहीच हरकत नाहीमात्र मासिकपाळीच्या काळात  बाळंतपणात योगासने करू नयेतआसने करीत असता श्वसनाची गती नेहमीसारखी सामान्य असावीआसने करताना किंवा करून झाल्यावर श्वासाचा वेग वाढता कामा नयेघाम येऊ नये  दमल्यासारखे वाटू नयेउलट योगासने करून झाल्यावर व्यक्तीला शांतप्रसन्नउत्साही  आनंदी वाटले पाहिजेयोगासनांच्या अभ्यासाच्या प्रारंभी ती सावकाश  संथ गतीने करावीतविशिष्ट आसन साध्य करण्यासाठी शरीराला झटके वा ताण देऊ नयेतआसनांची आदर्श स्थिती साधेपर्यतविशेषतः लवचिकपणा येईपर्यंतआसनांच्या मध्यंतरी अथवा प्रत्येक आसनानंतर थोडी थोडी विश्रांतीही घ्यावीप्रत्येक व्यक्तीने आपल्याला झेपेलत्याप्रमाणे एकेका आसनस्थितीचा काल  आवर्तन वाढविणे इष्ट  आरोग्यदृष्ट्या हिताचे असते.

  आसने करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी शरीर सामान्यपणे तीन स्थितीमध्ये ठेवावे लागतेउभ्या म्हणजे दंडस्थितीतबैठकस्थितीत आणि पाठीवरील शयनस्थितीत किंवा पोटावरील विपरीत शयनस्थितीतविवेचनाच्या सोईच्या दृष्टीने या तीन वर्गीकरणांनुसार काही निवडक आसनांचा इथे थोडक्यात परिचय करून दिलेला आहेयोगासनांवरील वेगवेगळ्या संदर्भग्रथांतून त्यांची कमीअधीक संख्या  त्यांनुसार वर्णने आढळून येतात.विपरीत शयनस्थितीतील (पोटावर झोपून करावयाचीआसने
   भुजंगासन
पोटावर झोपूनहात छातीजवळ टेकूनपोटापर्यंत शरीर मागे उचलणेमान वर उचलून मागेपर्यंत घेणे ही कृतीमुख्य संबंध पाठीच्या कण्याशी  पोटाच्या स्नायूंशीपोटाच्या स्नायूंवरील ताण पचनेंद्रियांवर योग्य परिणाम करतातपाठीच्या कण्याची लवचिकता वाढतेपाठदुखी वा पाठीच्या कण्याच्या गैर हालचालीवर उपचारात्मक उपयोग होतोमात्र पाठीच्या कण्याचे विकारअंतर्गळ (हर्निआ)आतड्यांचा क्षयरोग किंवा पोटाच्या अन्य विकारांची तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी आसने करू नयेत.

शलभासन
विपरीत शयनस्थितीहनुवटी जमिनीवर टेकलेली दोन्ही मांड्यांजवळ तळहात पालथेजमिनीला टेकलेलेश्वास सोडणेश्वास घेत घेत गुडघा  वाकविता एकेक पाय हळूच वर उचलणेकमरेपासून ताठ स्थितीत पायाचे चवडे मागील बाजूस ताणून धरणेश्वसन संथएकदा डावा पाय मागे वरतीएकदा उजवा पायहे होते अर्ध-शलभासनदोन्ही पाय एकाच वेळी उचलून हे केल्यास पूर्ण शलभासन होतेया आसनातील ताण विशेषेकरून पाठीचे शेवटचे मणकेओटीपोटातील स्नायू  मांडीतील स्नायू यांवर येतातत्यामुळे त्या त्या स्नायूंची कार्यक्षमता वाढतेतसेच लहान आतडे  मोठे आतडे यांवरही ताण पडून स्नायूंची अधिक ताणासहित हालचाल होऊन पचनक्रियेस मदत होते.
(धनुरासन विपरीत शयनस्थितीपाठीमध्ये संपूर्ण कमानमागील बाजूला ओटीपोटाचा  शरीरमध्याचा भाग जमिनीवर टेकलेलागुडघे मागे दुमडून घोटे हातांनी खेचून धरलेलेनजर वरतीहनुवटी वर उचलूनगळ्याचा पुढील भाग वर खेचलेलाश्वास संथपणे घेणे  सोडणेअशा आसनातआसन उतरवून पूर्वस्थितीत जास्तीत जास्त संथपणे यावे लागतेयोग्य आसनस्थितीमध्ये खांदेछातीपोटाचाही काही भाग  मांड्या ताणून उचललेल्यागुडघेही घोट्याजवळ धरलेल्या हाताच्या पकडीने खेचल्यामुळे अधिक गोलाकार होऊ द्यावेभुजंगासनात पाठीचे वरचे मणकेशलभासनात खालचेतर या धनुरासनात मधल्यांसह सर्वच मणक्यांना ताण बसतोतसेच पोटमांड्यापायदंड  हात यांवरही ताण बसतोपोटावर पडणाऱ्या सर्वाधिक दाबाने पोटातील इंद्रिये  पाचकरस निर्माण करणाऱ्या विविध ग्रंथी आणि यकृतस्वादुपिंड यांच्यावर दाब पडून अनुकूल परिणाम होतोहातापायांतील शिरा ताणल्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतेपोटाचेपाठीचे  तत्संबंधी विशेष विकार असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय  मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये
  (नौकासन विपरीत शयनस्थितीदोन्ही बाजूंनी निमुळत्या होत गेलेल्या  दोन्ही बाजूंनी वर उचललेल्या नौकेप्रमाणे शरीराची स्थिती करणेदोन्ही हात खांद्यांपासून पुढे नेऊन नमस्काराप्रमाणे जोडलेले  शरीर वर उचलत उचलत छातीपर्यंत उचलणेप्रारंभी श्वास सोडलेलापण जसजसे शरीर वर उचलले जाईलतसतसा श्वास घेत जाणेआसनस्थितीत संथपणे श्वसनखांदे-हात उचलत असतानाच मांड्या ताठ करून ताणलेले गुडघेही हळूहळू वर उचलावेशरीराचा सारा भार पोटावर येऊ द्यावातांत्रिक हालचालींच्या दृष्टीने धनुरासन  नौकासन या दोन्हींत बरेचसे साम्य असून ताण बरेचसे तेच असतातपरस्परांना खेचणारा आधार नसल्याने हातांवर  पायांवर जरा अधिकच ताण पडतोपाठीचे  पोटाचे स्नायू आणि पचनेंद्रियांच्या हालचाली यांस पूरक ठरते.

शयनस्थितीतील आसने
पाठीवर झोपून ज्या आसनांचा प्रारंभ  शेवट केला जातोअशांपैकी काही मोजक्या आसनांची वर्णने पुढे दिली आहेत :
(द्विपाद  उत्तानासन शयनस्थितीप्रारंभी श्वास सोडलेलानंतर श्वास घेत घेतदोन्ही पाय जोडलेल्या स्थितीत उचलत उचलतजमिनीशी काटकोन होईपर्यंत उचलणेताणून स्थिर करणेगुडघ्यांत ताठ  ते परस्परांना चिकटलेले असावेतपाठ आणि खांदे जरासुद्धा उचलू नयेतचवडे खेचून वरती आकाशाकडे न्यावेतपोटाच्या  मांड्यांच्या स्नायूंवर ताण पडू देऊ नयेते ढिले राहतील याची काळजी यावीहे आसन केल्याने मांड्यांच्या स्नायूंवर ताण पडतोतसेच पोटातील स्नायू आकुंचन पावतातअंतरेंद्रियांवर दाब पडतोलहान  मोठे आतडे यांवर  पाचकग्रंथींवर चांगला परिणाम होतोहे आसन पचन  उत्सर्जनादी विकारांवर उपयुक्त आहेहेच आसन एकदा फक्त डावा पाय वर घेऊन केल्यासतसेच फक्त उजवा पाय वर घेऊन केल्यास ते एकपाद उत्तानासन होते.

(विपरीत करणी
शयनस्थितीउत्तानपादासनापेक्षा शरीर अधिक म्हणजे खांद्यापर्यंत उचलूनफक्त खांदे  डोके जमिनीवर टेकवून हातांनी शरीराला आधार द्यावाहळूहळू श्वास घेत घेत आसन पूर्ण स्थितीला न्यावेकटिबंधाच्या हाडाखाली हाताच्या तळव्यांनी आधार द्यावाकोपरे जमिनीला टेकून हातांना आधार द्यावापाठ तिरकीमान पूर्णपणे मोकळी ठेवावीगुरुत्वाकर्षणामुळे अशुद्ध रक्त हृदयाकडे विशेष गतीने जातेपाय ढिले सोडून हृदयावरील ताण कमी करता येईलपोटरीलातळपायाला मुंग्या येतील एवढा वेळ मात्र हे आसन करू नयेहृदयविकार किंवा रक्तदाबादी विकार असणाऱ्यांनी अशी आसने वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावीत.
(सर्वांगासान
शयनस्थितीविपरीत करणीच्या पुढे गोलाकार पाठ अधिक वर उचलूनशरीराचा सर्व भार खांद्यांच्या फक्त वरील भागावर घ्यावाकोपरात काटकोन  करता बरगड्यांना हाताच्या तळव्याचा आधार द्यावाहनुवटी छातीच्या खळग्यात अशी बसवावीकी तोंडसुद्धा उघडता येऊ नये (विपरीत करणीमध्ये तोंड उघडता येते). हनुवटी छातीच्या खळग्यात बसल्यामुळे जालंधर नावाचा बंध बांधला जातो.
एकूण महत्त्वाच्या अशा आठ-दहा असनांमध्ये सर्वांगासनाचा अंतर्भाव केला जातोअनेक ग्रंथींची कार्यक्षमता या आसनाने विकसित होतेअवटुग्रंथी (थायरॉइड)पोषग्रंथी (पिच्युटरी ग्लँडया महत्त्वाच्या अंतःस्रावी ग्रंथींवर कमी अधिक प्रमाणात दाब येतोस्वास्थ्यासाठी या ग्रंथींचे योग्य प्रकारे पाझरणे अत्यावश्यक असतेया दोन ग्रंथींचा परिणाम एकंदरीत वाढीवर  जननसंस्थेवरही होत असतोअग्निमांद्यबद्धकोष्ठता विकारांवर हे आसन उपचारार्थ वापरता येतेमात्र त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहेया आसनात जालंधर बंध बांधला जातोत्यामुळे त्याला प्रतिपूरक म्हणून मत्स्यासन करून मत्स्यबंध बांधला जाणे आवश्यक असते.

  मत्स्यासन
शयनस्थितीदोन्ही पायांत सु३०-३५ सेंमीअंतर ठेवावेदोन्ही गुडघे जास्तीत जास्त दुमडूनतळवे वर यावेकोपराच्या आधाराने पाठ-खांदे उचलून टाळू टेकावीमान उलटी ताठ करावीहनुवटी वर येईलहातांनी त्या त्या बाजूच्या पायांचे अंगठे धरावेअधिक चांगले आसन आल्यावर विरुद्ध पायांचे अंगठे धरावेमांड्या जमिनीवर टेकल्या पाहिजेतत्यामुळे त्यांना  पोटाला योग्य ताण पडेलसर्वांगासनाच्या उलट बंध तयार होतोत्यावेळी ताणलेल्या ग्रंथी आता मोकळ्या होतातडोक्याच्या विशिष्ट अवस्थेमुळे मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो.
(हलासन
शयनस्थितीहल म्हणजे नांगरशरीराची स्थिती नांगराप्रमाणे होतेम्हणून हलासनश्वास सोडलेलानंतर पाय उचलता उचलता श्वास होतेद्विपाद उत्तानासनाप्रमाणे वर घेतलेले पायडोक्यावरून पलीकडे टेकवावेगुडघे ताठचवडे ताठ  अंगठे जमिनीला टेकवावेहात खांद्याच्या पुढे पाठीच्या बाजूला सरळ रेषेत टेकवावेछाती हनुवटीवर दाबली जाते  जालंधर बंधही बांधला जातोपाठीचा कणा ताणला जातोत्याला लवचिकता येतेकमरेपासून पायापर्यंतच्या स्नायूंवर ताण येतोत्यामुळे नाड्यांची शुद्धी होतेपोटाचे स्नायू  त्यातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढतेपचन चांगले होते.
(१०नौकासन
शयनस्थितीप्रथम श्वास सोडावाश्वास घेत घेत पाय एकमेकांना जोडून वर उचलावेत्याचवेळी पाठ हळूहळू वर उचलावीपाय सु४५ अंशांपर्यंत (जमिनीशी कोनउचलले गेलेकी हात ताणून अंगठे धरावेविपरीत शयनस्थितीतील नौकासनामध्ये पोटाच्या स्नायूंचे प्रसरण  पाठीच्या स्नायूंचे आकुंचन आहेतर नौकासनात पोटाच्या स्नायूंचे आकुंचन आहे  पाठीच्या स्नायूंचे प्रसरण आहेएकंदर शरीराला आधार कमी असल्याने तोल अधिक सांभाळावा लागतोअंगठे पकडण्याऐवजी घोटेमांड्या पकडूनही प्रारंभी तोल सावरून आसन करावेपोटाचे आकुंचन म्हणून त्यातील आतडीयकृतस्वादुपिंडमूत्रपिंड यांवरील दाब वाढतोकार्यक्षमता वाढतेमूत्रपिंडासंबंधीचे विकार मार्गदर्शक सरावाने कमी करता येतात.
(११पवनमुक्तासन
शयनस्थितीपाय उत्तानपादासनाप्रमाणे उचलावेमग गुडघ्यात दुमडावे  दोन्ही हातांनी गुडघ्यांना पोटावरछातीवर दाबून विळखा द्यावामान  डोके वर उचलावेअपानवायूच्या पवनमार्गातमुख्यतः मोठ्या आतड्याच्या मार्गात अडकलेल्या वायूची (बळानेमुक्ती होण्यास हे आसन उपयुक्त ठरतेगुदद्वारातून वायू बाहेर पडतोपचनक्रिया सुधारतेशौचास साफ होतेपोटाची एखादी शस्त्रक्रियाअंतर्गळमूळव्याध वा अन्य अपचनाचे विकार असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्याने हे आसन करावे.
(१२शवासन
शयनस्थितीसंपूर्ण शारीरिक  मानसिक विश्रांतीसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त असूनसर्व आसने करून झाल्यावर हे आसन करण्याची पद्धती आहेदोन्ही पायांत साधारण ३५ ते ४५ सेंमी. (सव्वा ते दीड फुटअंतर ठेवावेहात अलगद बाजूला करावेमान सोईच्या बाजूला कलती करावीआपण मनानेच संपूर्ण शरीर पायापासून डोक्यापर्यंत शिथिल करत आणावेआसनस्थिती दिसायला अतिशय सोपीपण या आसनातील शरीरस्थितीची (बॉडी कन्सेप्टआत्मानुभूती प्रत्येकाला व्यक्तिगत दृष्ट्या येतेशरीरातील स्नायू ढिले सोडून त्यांच्या त्या शिथिलतेमुळेताणविरहित वाटणारी स्थिती अनुभवता येणे आवश्यक आहेही स्थिती अनुभवण्यासाठी – म्हणजे एखाद्या शवासारखी आत्मजाणीव होण्यासाठी - शरीर पाठीवर निजल्या स्थितीत जमिनीवर ठेवणे सुलभ जातेम्हणून हे आसन सांगितले आहेया आसनात शरीर ढिले ठेवणे जसे आवश्यकतसेच मनातही विचारांची गर्दी होऊ  देता ते स्थिर  शांत ठेवणे आवश्यक असतेशरीरावर मनाचे नियंत्रण जास्तीत जास्त सहज  मंद-मंदतर श्वसन आणि अत्यंत स्थिर असावेशरीराचा तोल राखण्यासाठी – शक्तीताण  प्राणवायूची कमी गरज लागावी म्हणून – शयनस्थितीने प्रारंभ करतातअवयवइंद्रिये यांवरील दाबताणआकुंचनप्रसरण ह्या सर्वांवर नियंत्रण आणून विश्रांती मिळतेफक्त श्वासपटलाची मंद हालचाल चालतेमेंदूची विचारप्रक्रिया कमी करून त्याकडेही कमी रक्तपुरवठात्यामुळे मेंदूला-मनाला विश्रांती  संथ मनोव्यापाराने मज्जासंस्थेला विश्रांती मिळावीत्यानंतर मात्र पुनरुत्साहित होणे आवश्यकह्या आसनाची परिणती झोपेत मात्र होऊ नये.
  बैठक स्थितीतील आसने
बैठक स्थितीतील स्वस्तिकासनसमासनपद्मासन या आसनांमध्ये मांडीच्या टोकावर-गुडघ्यांवर-हातांच्या बोटांची जी विशिष्ट रचना करून ठेवतातत्यांना मुद्रा’ म्हणतातही मुद्रा विशेषेकरून ध्यानमुद्रा’ वा ज्ञानमुद्रा’ म्हणून ओळखली जातेअंगठ्याजवळील पहिले बोट अर्धे वळवून त्यावर अंगठ्याचे टोक असे ठेवावेकी त्यामध्ये पोकळ गोलाकार होईलउरलेली तिन्ही बोटे एकाशेजारी एक ठेवून सरळ ठेवावी.
(१३पद्मासन
बैठक स्थितीपसरलेल्या दोन्ही पायांत ३० ते ४५ सेंमीअंतर ठेवावेदोन्ही पाय क्रमाक्रमाने गुडघ्यांत दुमडून विरुद्ध बाजूच्या मांडीवर  जांघेवर त्यांचे चवडे ठेवावेदोन्ही हात गुडघ्यांवर टेकवून ज्ञानमुद्रा करावीशरीर ताठ  भार पाठीच्या कण्यामध्येमनाच्या एकाग्रतेसाठी याचा अधिक उपयोगम्हणून ध्यानधारणेसाठी अधिक वापर केला जातोह्याप्रमाणेच बद्ध पद्मासनात पायांची स्थिती असतेमात्र हात पाठीकडून नेऊन पुढे डाव्या हाताने उजव्या पायाचा  उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून पाठीवर ताण देऊन ताठ बसावेउत्थित पद्मासनात ही पायांची बांधणी (रचनापद्मासनासारखीच असतेमात्र दोन्ही हातांचे तळवे बाजूला टेकवूनहात ताठ करून  त्यांवर भार देऊनपोटाचे स्नायू वर खेचूनमांडी बांधलेल्या स्थितीत वर उचलून अधांतरी धरण्यात येतेपर्वतासनात पद्मासनाची स्थिती ठेवूनहात पुढे उचलून व बोटे एकमेकांत गुंतवून खांद्याच्या रेषेत पुढे समांतर घेतात  नंतर ती बोटे बांधलेल्या स्थितीत वरती उलटी करूनदंडांना-बाहूंना पीळ देऊन हात डोक्यावर ताठ केले जातातपद्मासन योगमुद्रा (मध्ये बैठक पद्मासनाचीच असतेमात्र दोन्ही हात मागे बांधूनपुढे वाकून समोर कपाळ टेकवतातमागे दोन्ही हात कोपरात  वाकविता बांधलेल्या स्थितीतच खेचून धरतातपद्मासन योगमुद्रा (मध्ये पद्मासन स्थितीत दोन्ही हात समोर पायावर घेऊन पोटाजवळ त्यांचे तळवे एकमेकांवर सहजपणे ठेवतात  योगमुद्रा (प्रमाणेच पुढे वाकून कपाळ पुढे जमिनीवर टेकवतात.
(१४आकर्ण धनुरासन
बैठक स्थितीधनुष्यावर लावलेला बाण खेचण्याची कृती या आसनातून प्रकट होतेम्हणून त्यास धनुरासन वा आकर्ण धनुरासन म्हणतातप्रथम दोन्ही पाय पसरून एकमेकांजवळ घ्यावेत  डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या मांडीवर यावामग डाव्या हाताने पसरलेल्या उजव्या पायाचा अंगठा धरावा  उजव्या हाताने डाव्या हाताखालून येणाऱ्या डाव्या पायाचा अंगठा धरून तो पाय उजव्या कानाजवळ आणावामात्र कान खाली आणणेम्हणजे मान पुढे घेणे नव्हेशक्यतोवर ताठच बसावेपायाचा ताण क्रमाक्रमाने वाढवत न्यावाश्वसन संथ असावेकमरेवर  गुडघ्यावर भरपूर ताण येऊन स्नायूंना मजबूती येतेहे आसन डाव्या  उजव्या दोन्ही अंगांनी केले जाते.
(१५वक्रासन
दोन्ही पाय समोरडावा पाय गुडघ्यात दुमडून मांडीजवळ घ्यावाउजव्या हाताची बगल त्या डाव्या गुडघ्यावर ठेवावी  दोन्ही तळवे डाव्या बाजूला पण परस्परविरुद्ध दिशांकडे बोटे करून ठेवावेमान मागील बाजूस वळवूनकमरेला-पाठीला-मानेला ताण द्यावापाठीचा कणा एका पातळीत राहून पिळला जातोत्याची लवचिकता वाढतेपोटालाही पीळ पडतो  अंतरेंद्रियांवर दाब  ताण येतोमज्जासंस्थेची कार्यक्षमता वाढतेहेच फायदे या आसनाशी बरेच साम्य असलेल्या अर्ध मत्स्येंद्रासनात अधिक प्रमाणात मिळतात.
(१६वज्रासन
बैठक स्थितीगुडघे दुमडून चवड्यावर बसावेदोन्ही पायांच्या टाचा बाहेर घ्याव्या  उलटे पाय टेकून त्यावर बसावेपुढे गुडघ्यावर दोन्ही हात पालथे ठेवावेश्वसनेंद्रिये मोकळी करण्यासाठी  ध्यानधारणेसाठी याचा विशेष उपयोग होतोपायाच्या घडीमुळे विशेष बंध बांधला जातोत्यामुळे कमरेपासून खालच्या शरीरावर रक्ताभिसरणात नियंत्रण म्हणून शीर्षासनानंतर हे आसन अवश्य करावेवज्रासनात पद्मासनमुद्रेप्रमाणे दोन मुद्रा करतातबैठक वज्रासनाचीमात्र हात मागे बांधून पुढे कपाळ टेकणे  दुसरी वज्रासनातील बैठकमात्र दोन्ही हात पुढे मांडीजवळ-पोटाखाली घेऊन कपाळ टेकणे.


  (१७पश्चिमोत्तानासन
हे योगासनातील एक प्रमुख आसन मानले जातेदोन्ही पाय पुढेहात सरळ  पायांचे अंगठे दोन्ही हातांनी धरावेपुढे वाकावेकपाळ गुडघ्यांना टेकवावे  दोन्ही कोपर दोन्ही पायांच्या बाजूंना जमिनीवर टेकवावेतगुडघे ताठ असावेत  टाचापोटऱ्यामांड्या जमिनीला टेकलेल्या राहाव्यातश्वसन संथपणे करावेया आसनात पायापासून मानेपर्यंत सर्व शिरांना ताण बसतोसर्व स्नायू आकुंचन पावल्याने फुप्फुसेउदरस्थ इंद्रिये  अंतःस्रावी ग्रंथी यांवर ताण पडतो  त्यामुळे कार्यक्षमता वाढतेपाठीच्या कण्याचा शेवटचा भाग  पचनेंद्रियांच्या तक्रारींवर हे आसन म्हणजे योग्य उपाय आहेआध्यात्मिक दृष्ट्या कुंडलिनी जागृतीसाठी या आसनाचा अभ्यास केला जातो.

दंडस्थितीतील (उभ्या स्थितीतीलआसने

(१८वृक्षासन

दंडस्थितीप्रथम श्वास सोडणेनंतर हळूहळू श्वास घेणेदोन्ही बाजूंना हात वर नेऊननमस्कार करूनताणून वर धरणेस्वतः जणू अधिक उंच होण्याचा प्रयत्न करीत शरीर उभे ताणणेटाचाही वर उचलणेनंतर श्वसन संथ ठेवणेआसन तोलात्मकस्नायूवरील ताण कमी करण्याकरता उपयुक्तसाधारणतः सर्व आसनांच्या शेवटी करावेया आसनात बहुतेक सर्व स्नायू एकाच उर्ध्वदिशेने प्रसरण पावतात.
(१९वीरासन
दंडस्थितीडावा पाय पुढे टाकून पाऊल जास्तीत जास्त पुढे न्यावेनमस्काराप्रमाणे जोडलेले दोन्ही हात पुढून जास्तीत जास्त वर न्यावेमानपाठ मागे वाकवावीउजवा पाय गुडघ्यात-मांडीत ताठ ठेवावाडावा गुडघा पुढे काटकोनात यावाहे आसन पाय बदलून दोन्ही अंगांनी करावेपायकमरपाठ उलट दिशेने वाकल्याने मलशुद्धी  रक्तपुरवठ्यास मदत होतेपोटातील स्नायूंवर ताण पडल्याने मेद कमी होण्यास मदत होते.

(२०तिकोणासन

दंडस्थितीडाव्या बाजूला डावा पाय जास्तीत जास्त नेऊन त्या पायाचा चवडा त्याच दिशेकडे तोंड करून ठेवावाश्वास सोडावाडावा गुडघा वाकवून  डावीकडे झुकून डावा हात जमिनीला लावावाउजवा पाय ताठ ठेवावाउजवीकडून उजवा हात उजव्या कानाला टेकून सरळ रेषेत वर वर ताणावाहीच सर्व कृती नंतर उजवा पाय वाकवून करावीशरीरभार वाकलेल्या पायाच्या पोटरीवर  मांडीवर आणि टेकलेल्या हातावर येतो  त्यांची कार्यक्षमता वाढते.

(२१शीर्षासन

यांखेरीज शीर्षासन हेही योगासनांतील एक प्रमुख आसन आहेप्रथम पुढे वाकून गुडघे जमिनीवर टेकवावे आणि दोन्ही हातांचे पंजे एकमेकांत जुळूवन हात कोपरापासून जमिनीवर ठेवलेल्या वस्त्रावर टेकावेत्यानंतर मस्तकाच्या टाळूचा पुढचा भागएका मऊ फडक्याच्या घडीवर हाताच्या पंज्यांना लागून ठेवावात्यावेळी मनगटे डोक्याच्या दोन्ही बाजूंना येतील अशी ठेवावीनंतर गुडघे वर उचलून हळूहळू छातीजवळ आणावेहात आणि डोके यांच्या आधारावर पाय जमिनीपासून वर उचलावे  गुडघ्यांजवळ वाकवून मांड्यांजवळ आणावेही प्रथमावस्थापाठ ताठ करून शरीराचा भार हाताच्या कोपरांवर घ्यावायानंतर दोन्ही पाय उचलून वर करावे  मांड्या सरळरेषेत एकमेकींजवळ स्थिर ठेवाव्यातगुडघे सरळ  करता पाय मागे घ्यावेही दुसरी अवस्थानंतर दोन्ही पाय सरळरेषेत वर ताणून ठेवावेडोकेछातीकमरगुडघेपायाचे अंगठे हे एका समरेषेत यावेतश्वासोच्छ्वास नाकानेच संथ करावाशरीर स्थिर राहील असे पहावेया सर्व अवस्था क्रमाक्रमाने  आस्ते आस्ते अत्यंत सावकाश साध्य कराव्यातहे आसन डोळ्यांचे आरोग्यरक्तशुद्धीउत्साह  शांत निद्रा यांसाठी करावे.

  भ्रामरी

कुंभकाच्या अगोदर भुंग्यासारखा आवाज काढीत पूरक करावानंतर कुंभक करून अखेरीस भृंगनाद करीत रेचक हळूहळू करावाह्या प्राणायामाने एक विशेष प्रकारचा आनंद होतोघेरण्डसंहितेत असे म्हटले आहेकी प्राणायामाचा अनके महिने अभ्यास केल्यानंतर शांत एकांतात बसले असताना नाजुक काशाच्या घंटेचा किंवा वीणेच्या तारांचा किवा दूरवर वाजणाऱ्या दुंदुभीचा वा अन्य वाद्याचा सूक्ष्म नाद साधकाला ऐकू येतोकुंभक करून त्याचे ध्यान करावयाचेहाच भ्रामरी कुंभक होय.
मूर्च्छा कुंभक वगळून पूरक आणि रेचक करावयाचेपूरकाच्या शेवटी जालंधर बंध अत्यंत दृढपणे करावा आणि नंतर रेचक करावायावेळी मूर्च्छा यावी म्हणजे सगळे सुखदुःखाचे विषय विसरावे अशी दृढ वासना मनाशी बाळगणे आवश्यक आहेदीर्घकाल वासना बाळगली तरच मूर्च्छा येणे (मन निर्विषय होणेशक्य आहेकाही ग्रंथकारांनी मनाला गुंगी येईल असेही औषध अशा प्रकारच्या प्राणायामाच्या वेळी सेवन करावयास सांगितले आहेहे औषध कोणते हे मात्र कल्पनेनेच जाणावयास पाहिजे.

प्लाविनी पूरक करून पोट भरावेआपले शरीर तरंगत आहेअशी भावना करावीअशी भावना दृढ झाली म्हणजे कुंभकाच्या वेळी आपले शरीर अधांतरी कमलपत्राप्रमाणे स्थिरावले आहेअशी जाणीव होते.

प्रथम सांगितलेल्या प्राणायामाचा साधारण प्रकार आणि कुंभकांचे वरील आठ प्रकार यांचा अभ्यास करीत असताना कालांतराने पूरक आणि रेचक यांची आवश्यकता भासत नाही आणि नुसता केवल कुंभक सिद्ध होतोरेचक आणि पूरक मिळून कुंभक म्हणजे सहित कुंभक आणि रेचक  पूरक  करताच जो कुंभक साधता येतो त्यास केवल कुंभक म्हणतात.
कुंभकाचे आणखी अंतःकुंभक आणि बहिःकुंभक असे दोन प्रकार आहेतपूरकोत्तर प्रथम केलेला कुंभक हा अंतःकुंभक होयपूरक करून लगेच रेचक करावापोट  छाती रिकामी झाल्यावर जालंधरउड्डियान  मूल बंध करून पूरक  करता थांबणे म्हणजे बहिःकुंभक होय.
प्राणायामाचे दोन प्रकार - अमंत्रक आणि समंत्रकअमंत्रक म्हणजे मंत्रावाचून करावयाचासमंत्रक म्हणजे मंत्रासहउदा.वेदाध्ययनाचा अधिकार असलेल्या त्रैवर्णिकांनी खालील सव्याहृतिकसशिरस्क गायत्रीमंत्र जपायचा असतोतो असा : ओम् भूर्भुवस्वमहजनतपसत्यम्’ या सात व्याहृती उच्चारून नंतर प्रणवोच्चारपूर्वक गायत्रीमंत्र उच्चारायचा आणि गायत्रीमंत्राच्या शेवटी ओम् आपोज्योती रसोSमृतं ब्रह्म भूर्भवस स्वरोम्’ हे शिरस् (टोकजोडायचेकिंवा ज्या साधकाची जी उपास्य देवता असेल त्या उपास्य देवतेचा मंत्र प्राणायामाच्या वेळी देवतेच्या अनुग्रहाकरिता जपायचा असतो.
योगविद्येचाविशेषतयोगासने आणि प्राणायाम यांचाभारतात  पश्चिमी देशांमध्ये अलीकडे प्रसार होत असून योगविद्येचे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने संशोधनही सुरू झाले आहेडॉडीजीरेळे तसेच लोणावळे येथील कैवल्यधाम’ या योगविद्येच्या अभ्यासाच्या केंद्राचे संस्थापक स्वामी कुवलयानंद आणि त्यांचे सहकारी यांनी योगासने आणि प्राणायाम यांचे विशेष संशोधन केले आहेत्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य असे-प्राणायाम आणि जिमखान्यातील इतर व्यायामांचे प्रकार यांच्यात मुख्य भेद असाकी यौगिक आसने आणि प्राणायाम यांच्या योगाने घडणारा व्यायाम हा दमछाट करणारा वा शरीरशक्ती पणास लावणारा स्नायूंचा व्यायाम नसतोरोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य ही दोन्ही प्रकारच्या व्यायामांची प्रयोजने होतपरंतु यौगिक व्यायामामध्ये मनाची शक्ती आणि शांती वाढून मनोरोगांचेही निवारण होतेमनोरोगांना प्रतिबंध होतो जिमखानी व्यायामांचे नसतेकारण मानसिक दौर्बल्य घालविणे आणि मनःसामर्थ्य वाढविणे हा त्यांचा उद्देश नसतोपरंतु यौगिक व्यायामामध्ये हा एक प्रमुख उद्देश मानला जातोदुसरे असेकी आसनांचा व्यायाम जरी सौम्य असलातरी इतर व्यायामांमध्ये व्यायाम सुटल्याबरोबर मेदवृद्धी होऊन शरीर स्थूल बनण्याचा धोका असतोतो धोका आसनांच्या व्यायामांमध्ये कमी असतोतिसरे असेकी प्राणायामाचे मुख्य उद्दिष्ट शरीर  मन या दोघांची शुद्धी आणि आरोग्य हे असल्यामुळे त्यात मेंदू आणि मज्जातंतू यांचे पोषण करणाऱ्या ऑक्सिजन वायूचा रक्ताला भरपूर पुरवठा करणे हे महत्त्वाचे कार्य होतेप्राणायामाने अंतरिंद्रियांमध्ये रुधिराभिसरण वाढतेस्नायूंचे श्रम टाळून प्राणायाम करायचा असतोत्यामध्ये हृदयफुप्फुसेअन्ननलिकाश्वासनलिका इत्यादिकांचा व्यायाम प्रामुख्याने घडत असतोऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा खोलात खोल सूक्ष्म प्रवेश प्राणायामाने सतत घडत असतोप्राणायाम करत असताना शरीराचे कोणतेही भाग श्रमाने थकत नाहीतत्यामुळे शरीरातील सगळी इंद्रियेअन्नाशयलहानमोठ्या अन्ननलिकायकृतस्वादुपिंडमूत्रपिंडमूत्राशयमलाशय सर्वांना ऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा पुरवठा होतोकारण या सगळ्यांना मूल बंधउड्डियान बंधजालंधर बंधभस्त्रिका इत्यादिकांनी मर्दन घडत असतेकपालभातीच्या योगाने काननाकडोळेघसाफुप्फसे आणि हृदय

  यांच्यातील दूषित वायूचा सारखा निचरा होतोएकंदरीत मेंदू आणि पृष्ठवंश यांनाही ऑक्सिजनने भरलेल्या रक्ताचा पुरवठा होतो आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त आत्मसात करण्याची शक्ती प्राप्त होते.

No comments:

Post a Comment