काही आणखी आसने
कर्ण पिडासन
क्रिया -
१) जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला.
२) आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा.
३) हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा. पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा.
४) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा.
लाभ -
१) हलासनाप्रमाणेच मेरुदंड निरोगी व लचकदार होतो व पृष्ठभागाच्या मांसपेशींना विस्तृत व निरोगी बनवते.
२) थायरॉईड ग्रंथी तरतरीत होऊन लठ्ठपणा, बुटकेपणा व अशक्तपणा दूर होतो.
३) अजीर्ण, मंदाग्नी, बद्धकोष्ठता व हृदयरोगात लाभकारक आहे.
४) अग्न्याशय सक्रीय होवून डायबिटीज बरा होतो.
५) कष्टार्तव इत्यादी स्त्री रोगात उपयोगी आहे.
६) कानाच्या रोगात विशेष लाभकारक असल्याने या आसनाचे नाव कर्ण पीडासन आहे.
सावधगिरी - उच्च रक्तदाब, सर्वाइकल व मेरुदंडात टी. बी. इत्यादी विकार असल्यास हे आसन करू नये.
योग मुद्रासन
क्रिया -
१) पद्मासनात बसून उजव्या हाताचा तळहात आधी नाभीवर ठेवा.
२) आणि डावा तळहात उजव्या हातावर ठेवा.
३) मग श्वास बाहेर सोडून पुढे वाका.
४) हनुवटी जमिनीवर टेकवा व नजर समोर ठेवा.
५) श्वास आत घेऊन पूर्वस्थितीत या. असे ४-५ वेळा करा.
लाभ -
१) पोटासाठी उत्तम आसन आहे. जठराग्नी प्रदीप्त करते आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी ठीक होतात.
२) पॅनक्रिया क्रियाशील करून मधुमेह नियंत्रण ठेवण्यात अतिशय लाभकारक आहे.
शशकासन
क्रिया -
१. वज्रासनात बसून श्वास आत घेऊन दोन्ही हात वर उचला.
२. पुढे वाकत श्वास बाहेर सोडा व हात समोर पालथे ठेवावे. कोपरापर्यंत हात जमिनीवर टेकवा.
३. डोकेसुद्धा जमिनीवर टेकवा.
४. काही वेळ अशा स्थितीत राहून पुन्हा वज्रासनात या.
लाभ -
१. स्वाभाविकरित्या हृदयाला मालिश घडते. म्हणून हृदय विकारांच्या रोग्यांसाठी हे आसन लाभदायक आहे.
२. आतडी, यकृत, अग्न्याशय व मूत्रपिंड सशक्त होतात.
३. मानसिक रोग, तणाव, क्रोध, चिडचिडेपणा,
राग इत्यादी दूर होते.
४. स्त्रियांचे गर्भाशय सशक्त होते. कंबर व नितंब यांची चरबी कमी होते.
पवन मुक्तासन
क्रिया

१. सरळ झोपून डाव्या पायाचा गुडघा छातीवर ठेवा.

२. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवून गुडघ्यावर ठेवा. श्वास बाहेर सोडत गुडघा दाबून छातीला लावा व डोके वर उचलत गुडघ्याने नाकाला स्पर्श करा. जवळ जवळ १० ते ३० सेकंद पर्यंत श्वास बाहेरच ठेवून अशा स्थितीत राहून मग पाय सरळ करा. हे २/४ वेळा करा.

३. असचे दुस-या पायाने पण करा. शेवटी दोन्ही पाय एकदम उचलून आसन करा. म्हणजे एक चक्र पूर्ण झाले. असे ३-४ वेळा करा.
४. दोन्ही पायांना पकडून कंबरेला मालीश करा. शरीराला मागे पुढे उजवीकडे डावीकडे करा.
लाभ
१. हे आसन नावाप्रमाणेच गुणकारी आहे. उदरगत वायुविकारासाठी हे खूपच लाभदायक आहे.
२. स्त्री रोग अल्पार्त्तव,
कष्टार्त्तव व गर्भाशयासंबंधी सर्व रोगांसाठी उपयोगी आहे.
३. आम्लपित्त,
हृदयरोग, आमवात व कंबरदुखी यात हितकारक आहे.
४. पोटावर वाढलेली चरबी कमी होते.
५. जर कंबरेत जास्त दुखत असेल तर डोके उचलून गुडघ्याला नाक लावू नका. फक्त पायांना दाबून छातीला स्पर्श करा. असे केल्याने स्लिपडिस्क,
साईटिका व कंबर दुखणे थांबते.
[12/28, 3:46 PM]
Anant Deo: 0⃣8⃣
[12/28, 3:47 PM]
Anant Deo: मत्स्यासन
[12/28, 3:48 PM]
Anant Deo: 
क्रिया :
१) पद्मासनाच्या स्थितीत बसून हातांची मदत घेऊन मागे कोपरे टेकवून झोपा.
२) हात वर उचलून तळहात खांद्यामागे जमिनीवर टेकवा. तळहातांवर दाब देऊन मान जितकी मागे वळवता येईल तेवढी वळवा. पाठ ताणलेली व छाती वर उचललेली असावी. गुडघे जमिनीपासून दूर होऊ देऊ नका.
३) हातांनी पायांचे अंगठे पकडून कोपरे जमिनीला टेकवा. श्वास आत घ्या.
४) आसन सोडताना ज्या स्थितीत सुरु केले होते त्याच स्थितीत परत या खांदे व डोके जमिनीवर टेकवत पाय सरळ करून शवासनात झोपा.
५) हे सर्वांगासनाचे प्रतियोगी आसन आहे. म्हणून याला सर्वांगासनानंतर करायला पाहिजे.
लाभ :
१) पोटासाठी उत्तम आसन आहे. आतडे सक्रीय करून बद्धकोष्ठता ठीक होते.
२) थायरॉईड, पॅरा थायरॉईड व एड्रीनलला स्वस्थ बनवते.
३) सर्वाइकल पेन व मानेचे मागचे हाड वाढले असल्यास लाभकार आहे.
४) नाभी सरकणे दूर होते. फुफ्फुसाच्या रोगात दमा-श्वास इत्यादी ठीक होतात.
मण्डुकासन
मण्डुकासन (१)

क्रिया :
१) वज्रासनात बसून दोन्ही हाताच्या मुठी वळवा. मुठी बंद करताना अंगठे बोटांच्या आत दाबून ठेवा.
२) दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूला लावून श्वास बाहेर सोडा व समोर वाका. नजर समोर ठेवा.
३) थोडावेळ या स्थितीत राहून मग पुन्हा वज्रासनात या. असे ३-४ वेळा करा.
लाभ :
१) अग्न्याशय (पॅनक्रिया) सक्रीय झाल्याने इन्स्युलिन अधिक प्रमाणात बनू लागते आणि डायबिटीस दूर करण्यास मदत करते.
२) उदर रोगांसाठी उपयोगी आहे.
३) हृदयासाठी लाभदायक आहे.
धनुरासन
क्रिया -
१. जमिनीवर पालथे झोपा. गुढघ्यात पाय दुमडून टाचा नितंबावर ठेवा. गुडघे व पंजे एकमेकांना जोडलेले असावेत.
२. दोन्ही हातांनी पायांच्या घोट्याजवळ पकडा.
३. श्वास आत घेऊन गुढघे व मांड्यांना क्रमशः उचलत वरच्या बाजूला ताणा. हात सरळ असू द्या.
४. मागचा भाग उचलल्यानंतर पोटाचा वरील भाग छाती, मान व डोकेसुद्धा वर उचला. नाभी व पोटाच्या खालचा भाग जमिनीवरच असू द्या.
५. शरीराची आकृती प्रत्यंचा ताणलेल्या धनुष्यासारखी होईल. अशा स्थितीत १० ते ३० सेकंद रहा.
६. श्वास सोडताना क्रमशः पूर्व स्थितीत या. श्वासोश्वास सामान्य झाल्यावर पुनः करा. असे ३-४ वेळा करा.
लाभ :
१. कणा लचकदार व स्वस्थ होतो. सर्वाइकल, स्पाँडीलायटीस, कंबर दुखणे व उदर रोगात लाभदायक आहे.
२. नाभी सरकली असल्यास फायदा होतो.
३. स्त्रियांच्या मासिक धर्माविषयी अडचणीत लाभदायक आहे.
४. मूत्रपिंड निरोगी करून मूत्र विकार दूर होतो भीतीमुळे मूत्र स्त्राव होत असल्यास हे आसन लाभदायक आहे.
No comments:
Post a Comment