Monday, November 21, 2016

सत्संगती -आंतरजालावरुन साभार

संगत ........
    आजवर संत महंतांनी या एका विषयावर खूप विवेचन केले संगत हि नेहमी चांगल्याचीच करावी संतांची करावी असं म्हटलंय तुक्कोबाराय म्हणतात ! संत संगतीचे काय सांगू सुख ! म्हणजे सुख हे संतांचा किवा अधिकारी महात्म्याच्या संगतीतच असत हे लक्षात घेतलं पाहिजे याउलट जर दृष्टांची संगत केली कि जीवनाचा नाश होतो तुकोबाराय म्हणतात ! ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला ! म्हणजे जसा एखादा हिरा आणी एक ढेकुण एका डब्बी मध्ये बंद करून ठेवलात तर सकाळ पर्यंत त्याच पाणी होत म्हणून संगत हि संतांचीच, सज्जनांचीच करावी, संतांच्या संगतीत अत्मोधार होतो जीवन सफल होत तर दृष्ट व्यक्तींच्या सहवासात जीवनाचा ऱ्हास होतो
सुभाषितकार फार छान लिहितात -
सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते
प्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते
अर्थ : तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याचा मागमूस सुद्धा राहात नाही. [पण] तेच पाणि जर कमळाच्या पानावर असले तर मोत्याच्या आकाराचे [सुंदर ] दिसते. तेच [पाणि ] स्वाती नक्षत्राच्या पावसात समुद्रात दोन शिम्पल्यांमध्ये पोचले तर त्याचं सुंदर मोती तयार होतो. सामान्यतः उत्कृष्ट , मध्यम आणि हीन अशा अवस्था सहवासामुळे लाभत असतात.
म्हणून

सदा संगती सज्जनाची धरावी

No comments:

Post a Comment