Monday, November 21, 2016

पंथराज--डॉ.स्नेहलता कुलकर्णी

    

पंथराज म्हणजे पंथांचा राजा! किंवा राजाचा मार्ग ! मार्ग कुठे जाणारा ? अर्थात राजप्रसादाकड़े. आणि म्हणूनच अत्यंत स्वच्छ,सुंदर ,सरळ अडथळा नसलेला असावा लागतो. ज्या योगाने पथिक सहजरीत्या राजमंदिरा पर्यंत जाऊन पोहोचेल.हा पथ साफ करण्याचे काम 72 हजार कामगार करीत असतात.त्यावर लक्ष ठेवणारे दहा मुकादम असतात,त्यावरचे दोन उपअभियंते असतात आणि त्यावर एक मुख्य अभियंता असतो.या सर्वांना कमिशनर मार्गदर्शन करतो.या पथावर सहा नाकी असतात,त्यांचे एकेक अधिकार असतात.त्यांची जकात चुकवल्यावरच पुढे जाता येते.आणि या पथावरून आक्रमण करणारी कोण असते? ती चैतन्य चक्रवर्तीनची शोभा सम्राज्ञी कुंडलिनी !! ही कुंडलिनी पुरंध्रीच्या चालीने विद्युल्लखेप्रमाणे झळकत राजप्रसादातील चक्रवर्तीला भेटण्यासाठी उत्सुक झाली आहे.

चतुर आणि सुजाण वाचकांना आतापर्यंत कळून चुकले असेल की पंथराज म्हणजेच पश्चिममार्ग !! हा मार्ग मुलाधारापासून पाठीच्या कण्यातून सहस्त्रार चक्रापर्यंत जातो.हा अंतरंग मार्ग आहे.

72 हजार कामगार म्हणजे 72 हजार नाड्या आहेत,दहा मुकादम म्हणजे दहा मुख्य नाड्या आहेत. इडा पिंगला या दोन उपअभियंते सुषुम्ना ही मुख्यअभियंता सर्व नाड्यांना धारण करणारी असून तिच्यामध्येच सर्व विश्व समावलेले आहे.सहा जकातनाकी म्हणजे सहा चक्रे आहेत.ह्याचे षटचक्रदर्शन म्हणजे जकात चुकवणे हे सर्व भेदल्यावरच शक्ती (कुंडलिनी ) पुढे सरकू शकते .

🌺 साधक योग्यांना हेच एकमेव मोक्षमार्गाचे द्वार आहे.🌺


🍀🍀 शक्तिपातदीक्षेनंतर साधकाला 'मला अनुभव द्या' असे म्हणावेच लागत नाही. 🍀🍀


डॉ.स्नेहलता कुलकर्णी यांच्या श्री वासुदेव निवास मधील  लेखातून

No comments:

Post a Comment