Monday, September 30, 2013

४ ध्यान आणि धारणा यातील फरक





       सोप्या शब्दात सांगायचे तर आपण धारण करतो ती धारणा आणि जे आपल्याया धारण करते ते ध्यान .आपण आसना वर बसलो मग देवाचे नाम घेवू लागतो,जप करू लागतो, विशिष्ट बिंदूवर वा प्रकाशावर लक्ष्य देतो, श्वासाचे अवलोकन करू लागतो जेणे करून आपल्या मनाचे धावणे थांबते ते स्थिर होते .हि झाली धारणा.जरी प्रत्यक्ष तसे व्हायला बराच वेळ लागतो.तरी हि प्रक्रिया आहे हे जाणून घेणे महत्वाचे
ध्यान आपण करू शकत नाही ते व्हावे लागते .ध्यानाची पूर्व तयारी म्हणजे आसनात बसण्या पर्यंत आपल्या हाती असते धारणा आपणच करत असतो .जेव्हा मन कुठल्याही आटीआटी शिवाय अपेक्षा शिवाय इच्छेशिवाय रिकामे,रिते होते .फुल फुलावे तसे अलगत उमलते तेव्हा ते ध्यान असते .

थोडक्यात जोवर कर्ता आणि करणे असते तोवर ध्यान नसते .

मग धारणेचा टप्पा न घेता ध्यानात जाता येईल का ? गंमत अशी कि  याचे उत्तर होय असे जरी दिले तरी ध्यान काय आहे हे कळे पर्यंत साधक धारणेचा बराच मोठा प्रवास करून आलेला असतो.निदान आपल्या देशातरी नक्कीच .

म्हणजे आपली कर्ताविहीन अवस्था असू शकते का? मनाचे अमन होते का? हि निष्क्रियता नाही का? असे प्रश्न उपस्थित होवू शकतात .यथावकाश त्याची उत्तर मिळतात.ती स्वत:च शोधावी लागतात 

(क्रमशः)

विप्र .

No comments:

Post a Comment