Saturday, September 28, 2013

३. ध्यान - पूर्व तयारी




ध्यानाला बसायची इच्छा हिच खरी तर ध्यानाची पूर्व तयारी .बाकी पतंजली ऋषींनी सांगीतल्या प्रमाणे स्थिर सुखासन; सहजपणे, सरळपणे दीर्घ काळ बसू शकेल असे आसन .स्वत:ला सोयीस्कर ती वेळ, शक्यतो फिक्स, जमत नसेल तर हवी ती.पोट भरलेले नसावे नाहीतर झोप येते.कपडे सैलसर, धुतलेले, स्वच्छ ,बसायला जाडसर आसन .
एकदा बसायला सुरुवात केली कि ,आपले आपल्याला कळते.काय करावे,काय खावे,म्हणजे ध्यानात बसायला जमते .थोडक्यात युक्त आहार विहार हा आपला आपणच शोधावा.नाही जमले तर आयुर्वेदाचा आधार घ्यावा.सारे अतिरेक टाळावे,हवे पणाचे अन नकोपणाचे ही .
आपण जेवढा या साऱ्या गोष्टींचा बाऊ करू तेवढा स्वत:ला ध्याना पासून दूर ठेवू .एकदा बसायला लागा .मग जे सुचेल जमेल ते ते करावे . विश्वास ठेवा मदत आपोआप मिळेल .
(क्रमशः)
विप्र

No comments:

Post a Comment