Saturday, October 5, 2013

५. ध्यानाचे प्रवेशद्वार



 ध्यानाची पुस्तके वाचली प्रवचने ऐकली कि सुरवातीला उत्साह असतो .आपण ध्यानाला बसतो ,थोडे नाम स्मरण करतो मन शांत होते ,मग मौनात जावू पाहतो  पण तो प्रवेश होत नाही म्हणून मग उतावीळ होतो .पुन्हा प्राणायाम,जप वगैरे करू पाहतो ,अन ध्यानाच्या मार्गावरून भटकतो       म्हणून काय करायचे या बद्दल आपण सावध असले पाहिजे .आपल्याला अकर्ता व्हायचे असते अक्रीयाशील अवस्थेत प्रवेश करायचा असतो.(करणे हा शब्द इथे नाईलाजाने वापरावा लागतोय.)
परंतु मन धावत असते विचारांचे मोहळ उठते आणि आपण त्यात हरवतो हे सत्य स्वीकारणे हा एक महत्वाचा पडाव असतो .इथे एकच गोष्ट हातात असते ते म्हणजे पाहणे ...
आपण आपल्या विचाराकडे पाहणे .विचार पाहणारा मी हा त्या क्षणी विचारा  पासून वेगळा होतो क्षणभर विचार रहित होतो अन मी पाहतो आहे या विचारात दुसऱ्या क्षणी अडकतो .विचार शब्द रुपात येतात आणि चित्र रुपात पण बहुदा दोघांच्या मिश्रणात.त्या विचाराकडे हा विचार चांगला, हा वाईट असे पाहत त्यांचे मूल्यमापन करीत बसणे हे विचार साखळी पुढे चालवणे होते .
     मग विचारांचे अक्रिय,तटस्थ,निवडरहित निरीक्षण करणे शक्य आहे ?याचे उत्तर होय आहे. ते तसे शक्य आहे किंबहुना हेच ध्यानाचे प्रवेशद्वार आहे .
    ध्यानाच्या प्रवासात कुठलाही नकाशा नसतो ,काहीही वेळापत्रक नसते .कधी, कसे, केव्हा हे प्रश्नच हद्दपार असतात .हि अशी साहस यात्रा आहे कि निधड्या छातीचे अन तळमळीचे योध्येच हा मार्ग पकडतात .

(क्रमशः)
विप्र

Monday, September 30, 2013

४ ध्यान आणि धारणा यातील फरक





       सोप्या शब्दात सांगायचे तर आपण धारण करतो ती धारणा आणि जे आपल्याया धारण करते ते ध्यान .आपण आसना वर बसलो मग देवाचे नाम घेवू लागतो,जप करू लागतो, विशिष्ट बिंदूवर वा प्रकाशावर लक्ष्य देतो, श्वासाचे अवलोकन करू लागतो जेणे करून आपल्या मनाचे धावणे थांबते ते स्थिर होते .हि झाली धारणा.जरी प्रत्यक्ष तसे व्हायला बराच वेळ लागतो.तरी हि प्रक्रिया आहे हे जाणून घेणे महत्वाचे
ध्यान आपण करू शकत नाही ते व्हावे लागते .ध्यानाची पूर्व तयारी म्हणजे आसनात बसण्या पर्यंत आपल्या हाती असते धारणा आपणच करत असतो .जेव्हा मन कुठल्याही आटीआटी शिवाय अपेक्षा शिवाय इच्छेशिवाय रिकामे,रिते होते .फुल फुलावे तसे अलगत उमलते तेव्हा ते ध्यान असते .

थोडक्यात जोवर कर्ता आणि करणे असते तोवर ध्यान नसते .

मग धारणेचा टप्पा न घेता ध्यानात जाता येईल का ? गंमत अशी कि  याचे उत्तर होय असे जरी दिले तरी ध्यान काय आहे हे कळे पर्यंत साधक धारणेचा बराच मोठा प्रवास करून आलेला असतो.निदान आपल्या देशातरी नक्कीच .

म्हणजे आपली कर्ताविहीन अवस्था असू शकते का? मनाचे अमन होते का? हि निष्क्रियता नाही का? असे प्रश्न उपस्थित होवू शकतात .यथावकाश त्याची उत्तर मिळतात.ती स्वत:च शोधावी लागतात 

(क्रमशः)

विप्र .

Saturday, September 28, 2013

३. ध्यान - पूर्व तयारी




ध्यानाला बसायची इच्छा हिच खरी तर ध्यानाची पूर्व तयारी .बाकी पतंजली ऋषींनी सांगीतल्या प्रमाणे स्थिर सुखासन; सहजपणे, सरळपणे दीर्घ काळ बसू शकेल असे आसन .स्वत:ला सोयीस्कर ती वेळ, शक्यतो फिक्स, जमत नसेल तर हवी ती.पोट भरलेले नसावे नाहीतर झोप येते.कपडे सैलसर, धुतलेले, स्वच्छ ,बसायला जाडसर आसन .
एकदा बसायला सुरुवात केली कि ,आपले आपल्याला कळते.काय करावे,काय खावे,म्हणजे ध्यानात बसायला जमते .थोडक्यात युक्त आहार विहार हा आपला आपणच शोधावा.नाही जमले तर आयुर्वेदाचा आधार घ्यावा.सारे अतिरेक टाळावे,हवे पणाचे अन नकोपणाचे ही .
आपण जेवढा या साऱ्या गोष्टींचा बाऊ करू तेवढा स्वत:ला ध्याना पासून दूर ठेवू .एकदा बसायला लागा .मग जे सुचेल जमेल ते ते करावे . विश्वास ठेवा मदत आपोआप मिळेल .
(क्रमशः)
विप्र

Wednesday, September 25, 2013

२. ध्यान- ध्यान का करावे ?


ध्यान का करायचे ?असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.पण मुळात ध्यान करता येत नाही ती करायची गोष्ट नाही .पण त्यासाठी बसता मात्र येते .तर ध्यानासाठी का बसायचे? याची अनेक उत्तरे आहेत.कुणाला मानसिक शांती ,कुणाला तणावापासून मुक्ती,कुणाला मनाची शक्ती वाढवणे,तर कुणाला इतरांना दाखवण्यासाठी ध्यान करायचे असते
             पण सर्व धर्म पंथ यांना ठामपणे माहित आहे कि स्वरूप जाणायला ,देव कळायला ,आत्म साक्षात्कार व्हायला ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही.किंबहुना यासाठीच ध्यान आहे.आपण कोण आहोत हे कळणे ज्याला महत्वाचे वाटते तो मुमुक्षु, आणि अश्या व्यक्तीलाच ध्यानात गोडी वाटते .अन्यथा या मार्गावर उत्सुकतेने जाणारे हे त्या विंडो शॉपिंग करणाऱ्या मुर्खासारखे आहेत,केवळ वेळ वाया घालवणारे.अशी गोडी नसेल तर उगाचच इथे येऊ नये .त्याने धन गोळा करावे .सुखाने संसार करावा.त्यात काही पाप नाही, कमीपणा नाही .
            मात्र जीवनात खरी शांती,समाधान,आनंद यांच्या शोधत निघालेला वाटसरू एक दिवस ध्यानाच्या मुक्कामाला येणारच यात संशय नाही.
(क्रमशः)
विप्र

Tuesday, September 24, 2013

१ ध्यान




ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत,कुठल्याही प्रकाराचे ध्यान असो .माणसाला त्याचा उपयोग,फायदा होतोच होतो .ज्याचा जसा पिंड असेल,संस्कार असतील त्याला ती पद्धती आवडते,त्यात वावगे काही नाही.ज्याने त्याने आवडेल तो मार्ग अनुसरावा. जबसे जागे तबसे सबेरा.हे इथे महत्वाचे आहे.

अष्टांग योगातील यम नियमादी शिड्यातील हि शेवटची पायरी आहे.खरतर आपण याला पायऱ्या म्हणतो म्हणून, पण ते एकाच वेळी सुरु झालेले जीवन प्रणाली पालन असते.

यम हा आचारशुद्धीचा महत्वाचा टप्पा .तर नियम हा व्यक्तिगत शुचिता सांभाळणारा टप्पा .प्राणायाम हे प्राणशुद्धी, नाडीशुद्धी करून अंतर्गत सामर्थ्य देते तर आसने शरीर योगमार्गा साठी सशक्त बनविते.प्रत्याहार म्हणजे नियमन .धारणा म्हणजे एकाग्रता .आणि मग येते ते ध्यान . व आठवे समाधी  

ध्यानाचा कुठला हि मार्ग अंगिकारला तरीही आणि माहित नसले तरीही यम नियम पालन केल्या वाचून पर्याय नसतो .कारण ध्यानमय जीवनाचा तो अपरिहार्य हिस्सा आहे.
(क्रमशः )

Monday, September 23, 2013

ध्यान (स्वामी माधवनाथ)



ñdm_r _mYdZmWm§Mo EH$m àg§JmVrb à~moYZ
EH$ {Xdg ñdm_tH$S>o Jobmo AgVmZm Ë`m§Zr {dMmab§, "gwédmVrbm Ü`mZ H$m H$am`M§ AgV§ ho gm§J ~a§ ! _bm Ë`mda H$mhr gwMb§ Zmhr. "_ZmMr EH$mJ« Am{U Z§Va {ZéÕ AdñWm hmoÊ`mgmR>r' Ag§ CÎma _mÂ`m _ZmV `oD$Z Job§ nU _r H$mhr ~mobbmo Zmhr. _J ñdm_r AmnUhÿZ åhUmbo, "Aao gwédmVrbm Ü`mZ Amnë`mbm O_V Zmhr Amho ho H$imd§ EdT>çmgmR>rM Ü`mZ H$am`M§ AgV§.'
_J bjmV `oV§ H$s {ZéÕ, d¥{Îma{hV, eyÝ` AdñWm dJ¡ao AmnU Omo {dMma H$aVmo VodT>r Vr AdñWm gmonr Zmhr.

Cnm` H$m`?
_ZmV Zm__§Ì ñ_aU H$arV amhU§ EdT>§M nwaog§ hmoV Zmhr. Ho$edñdm_tZr åhQ>b§ Amho Vg§ "ñ_aUm_mOr {dñ_aU' MmbyM amhV§. BVa {dMmad¥Îmr `oVmV, Zm_ KoVmo Amho ho {dñ_aU hmoV§ Va H$Yr ZwgV§ Zm_ ñ_aV§ nU Vo XodmM§ Amho Am{U Amnbm Ë`mÀ`mer H$mhr g§~§Y Amho `m ^mdmM§ {dñ_aU hmoV§. `m _§ÌmZo _Z em§V em§V hmoV Om`bm bj _§ÌmÀ`m ghmæ`mZo AmË_M¡VÝ`mer {ZJ{S>V ìhm`bm hd§ AgV§. "Aä`mg Am{U d¡am½`' Am{U d¥Îmr~m~V gmdY amhU§ ho `mgmR>rMo Cnm` AmhoV.
CR>Umè`m d¥Îmtda à{V{H«$`m Z XoU§ EdT>§ Oar _r H$ê$ eH$bmo Var ~a§M H$m_ Pmb§ Ag§ åhUVm `oV§. nU Varhr Vo nyU© Pmb§ Ag§ hmoV Zmhr H$maU CR>boë`m d¥Îmr gmoSy>Z XoVm `oVmV nU d¥ÎmrM§ CR>U§ ho gmoSy>Z XoVm `oV Zmhr H$maU Vr A§V…H$aUmMr {ñWVr AgVo. Ë`m pñWVrda Ë`mdoir H$am`Mm EH$M à`moJ `eñdr hmoVmo Vmo åhUOo Amnbm "ñd' qH$dm B©ída ho Amnbo AmË_M¡VÝ` Amho hr YmaUm Yê$Z ApñVËdmda nwÝhm nwÝhm bj AmUUo Am{U pñWa amhUo. `mVyZ ZH$iV {MÎmmMr pñWVr ~XbV AgVo Am{U BVa d¥Îmr em§V hmoVmV.
Ü`mZ à{H«$`m
em§V {R>H$mÊmr gmYmaU _D$ga Aem AmgZmda earamMo AmgZ `mo½` KmbyZ em§V ~gmdo. S>moio {_Qy>Z bj _ñVH$mV, H$nmimÀ`m _Ü`mer qH$dm S>moŠ`mÀ`m _Ü`mer (Q>miynmer) AmVyZ H|${ÐV H$amdo. ›, gmo@h_², am_ qH$dm lram_ Aem bhmZ Zm_ _§ÌmMo Amb§~Z ¿`mdo (åhUOo Ë`mMo ñ_aU H$amdo). `m_wio na_mËå`mÀ`m ApñVËdmMr OmUrd A{YH$m{YH$ ñnï> hmoV OmB©b. Ë`m Om{UdoVM amhm`Mo.
ñdm_r _mYdmZ§X