Thursday, November 5, 2015

शक्तिपात योग १


             शक्तिपात योग यालाच गुळवणी महाराज संप्रदायात महायोग असेही म्हणतात .
             शक्तिपात  म्हणजे गुरूंनी  आपल्या संकल्पाने शिष्या मधील कुंडलिनी जागृत करणे होय .
महाराष्ट्रात ही परंपरा श्री लोकनाथ तीर्थांचे महान शिष्य गुळवणी महाराजांनी आणली .त्यांचे शिष्य  दत्तमहाराज कवीश्वर यांनीही त्यांच्यानंतर हा मार्ग प्रशस्त केला .पुढे अनेक दिक्षाधिकारी झाले .त्यातही 
श्री .ढेकणे महाराज जे लोकनाथ महाराजांचे अनुग्रहित होते यांनी या मार्गाच्या प्रचारासाठी अथक मेहनत घेतली .

      शक्तिपात दीक्षा सर्वांना सरसकट द्यावी का देवू नये यात बरेच दुमत आहेत .कारण कुंडलिनी शक्ती ही 
साधारण सहज जाता येता मिळावी अशी वस्तू नाही .योग्यवेळ आल्यावर अधिकारी गुरुनी ती अधिकारी शिष्याला  देण्यात येणारी सर्वोत्तम कृपा ,अनुकंपा ,प्रेम असावी असे ही एक मत आहे

          खरे तर शक्तिपात शब्द प्रयोग न वापरताही अनेक गुरूंनी आपल्या शिष्यात हे शक्ती संक्रमण केले आहे .रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची गोष्ट तर जगजाहीर आहे .स्वामी स्वरुपानंदाचे पुण्याचे शिष्य स्वामी माधवनाथ यांनाही ही शक्ती होती .

           शक्तिपात दीक्षा मिळाल्यावर काय होते याची रस भरीत वर्णने लिहली गेली आहेत .उदा.प्राणायाम आपोआप होणे न केलेल्या पाहिलेल्या योग क्रिया घडणे .ओमकार उच्चारण होणे .वगैरे खूप काही .  त्यात तथ्य असेलही .पण या क्रिये च्या आकर्षणाने खूप लोक इथे ओढले जातात .अन काही घडले नाही की दुसऱ्या दुकानाकडे जातात .

           शक्तिपात आचार्यांच्या मते एकदा शक्तिपात झाला की ती शक्तीच तुमची गुरु होते आणि तुमची साधना करवून घेते .तुम्ही केवळ आसनावर बसने एवढेच करायचे व जे काही होते त्या कडे शांतपणे बघत बसायचे कालावधी हळूहळू वाढवित १ तास करायचं आहे .

        गुळवणी महाराज पंथात  दीक्षा घेण्या आधी घातलेल्या अटी तश्या जाचकच  आहेत .त्यात ही कांदा लसून न खाणे आणि विटाळ पाळणे आजच्या काळाला अनुरूप नाहीत किंबहुना मुंबई सारख्या ठिकाणी महा मुश्कील आहे .
           नर्मदे हर हर चे लेखक श्री.अवधुतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे यांच्या साधनामस्त आणि नर्मदे हरहर या पुस्तकातील वर्णनामुळे हा मार्ग पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आला .त्यात त्यांनी केलेले स्वत;च्या ध्यानाचे ,त्यातील अनुभवाचे वर्णन विलोभनीय आहे . (क्रमशः)



No comments:

Post a Comment