।। श्री गुरूदेव दत्त ॥
मित्रांनो ,स्वान्तसुखाय केलेला हा प्रयत्न आहे .थोडेफार कळणारे गुजराथी व शब्दकोश यांच्या मदतीने दत्त बावनी समजून घेतली .तो अभ्यास आहे
भावार्थ दत्तबावनी
।। श्री गुरूदेव दत्त ॥
जय योगिश्वर दत्त दयाळ
तुज एक जगमा प्रतिपाळ ||1||
हे योगीश्वर दत्तात्रेया तुझा जयजयकार असो,तू अतिशय दयाळू असून सर्व जगाचा प्रतिपाळ म्हणजे पालन पोषण करतोस
अत्र्यनसुया करी निमित्त
प्रगट्यो जगकारण निश्चित् ||2||
अत्री ऋषी आणि माता अनसुया यांच्या घरी जन्म येण्याचे तू केवळ निमित्त केले आहे (खरा तर तू जन्म मृत्यू यांच्या पलीकडचा आहेस )
परंतु तुझी अगाध करुणा म्हणून तू केवळ या जगासाठी त्याच्या उद्धारासाठी प्रकट झालं आहेस
ब्रम्हा हरिहरनो अवतार
शरणागतनो तारणहार् ||3||
देवा,तू ब्रह्मा ,विष्णू आणि महेश यांचा अवतार आहेस .तू शरण आलेल्या दिन आर्त जनांचा रक्षण करणारा ,त्यांना संकटातून सोडवणारा आहेस
अन्तर्यामि सतचितसुख
बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||4||
सर्व देहा मध्ये वास करणारे सत-चित-आनंदरूपी आत्मतत्व तू आहेस .आणि बाहेर मात्र दोन भुजा असलेला सद्गुरू म्हणून समोर उभा आहेस
झोळी अन्नपुर्णा करमाह्य
शान्ति कमन्डल कर सोहाय ||5||
तुझ्या हातातील झोळी खरे तर स्वत:च अन्नपूर्णा आहे (तरीही तू जन कल्याणाच्या मिषे भिक्षा मागत आहेस )शांती ही तुझ्या हातातील कमंडलूच्या रूपाने सुभोभित झाली आहे
क्याय चतुर्भुज षडभुज सार
अनन्तबाहु तु निर्धार ||6||
तू कुठे चतुर्भुज रूप धारण करतोस तर कधी षड्भुज रूप धारण करतोस .पण खरे तर तू अनंत बाहू आहेस म्हणजेच तुझ्या रुपाला मर्यादा नाही .
आव्यो शरणे बाळ अजाण
उठ दिगंबर चाल्या प्राण ||7||
हे प्रभू ,हा अजाण बाळ तुला शरण आला आहे .हे दिगंबरा उठ त्याचा स्वीकार कर,तुझ्यावाचून त्याचा प्राण जावू पाहत आहे
सुणी अर्जुण केरो साद
रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||8||
पूर्वी सहस्त्रार्जुनाने तुला भक्ती प्रेमाने साद घातली ती ऐकलीस आणि तू त्याच्या समोर साक्षात प्रकट होवून त्याचे मनोरथ पूर्ण केलेस
दिधी रिद्धि सिद्धि अपार
अंते मुक्ति महापद सार ||9||
त्याला तू अपार रिद्धी सिद्धीचे दान दिलेस ,आणि अंती आपल्या पावन चरणावर मुक्ती प्रदान केलीस
किधो आजे केम विलम्ब
तुजविन मुजने ना आलम्ब ||10||
तर मग हे देवा आज का हा उशीर करीत आहेस .तुझ्यावाचून मला दुसरे काही सुचत नाही
विष्णुशर्म द्विज तार्यो एम
जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||11|| ॥
तू विष्णू शर्मा या ब्राह्मणाचा तारणहार झालास ,भक्ताच्या प्रेमासाठी त्याच्या घरी जावून श्राद्धाचे जेवण जेवलास
जम्भदैत्यथी त्रास्या देव
किधि म्हेर ते त्यां ततखेव ||12||
जंभ दैत्याच्या त्रासाने देव शिणले होते परंतु त्याचा नाश करून देवांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवले .
विस्तारी माया दितिसुत
इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||13||
दिती सुताने आपल्या मायेच्या प्रभावाने देवांना जेरीस आणले तेव्हा तू देवेंद्राला मदत केलेस अन त्याच्याकडून त्याचा संहार केलास .
एवी लीला कइ कइ सर्व
किधी वर्णवे को ते शर्व ||14||
अशी जी काही अपूर्व लीला तू केली आहेस तिचे वर्णन भगवान शंकराला वर्णन करता येत नाही
दोड्यो आयु सुतने काम
किधो एने ते निष्काम ||15||
राजा आयुच्या पुत्रासाठीराजा नहुषासाठी तू धाव घेतलीस आणि त्याला तू निष्काम केलेस
बोध्या यदुने परशुराम
साध्यदेव प्रल्हाद अकाम ||16||
तू राजा यदु ,परशुराम ,सांध्यदेव आणि प्रल्हाद यांना बोध केलास (अन त्यांना अकाम केले अकर्म स्थितीला नेवून पोहचवले)
एवी तारी कृपा अगाध
केम सुने ना मारो साद ||17||
अशी तुझी कृपा अगाध आहे ,तर मग तू माझी हाक का ऐकत नाहीस ?
दोड अंत ना देख अनंत
मा कर अधवच शिशुनो अंत ||18|| ॥
हे अनंता तू माझा अंत पाहू नकोस .या बाळाचा असा मध्येच शेवट करू नकोस त्याला तार .
जोइ द्विज स्त्री केरो स्नेह ॥
थयो पुत्र तु निसन्देह ||19||
द्विजस्त्रीचा स्नेह पाहुनि तू नि:संदेहपणे तिचा पुत्र झालास
स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ
तार्यो धोबि छेक गमार ||20||
तू स्मरण करताच भक्तासाठी धावतोस ,तू कलीचा नाश करणारा कृपाळू आहेस ,तू गावंढळ धोब्याचा उद्धार केलास .
पेट पिडथी तार्यो विप्र
ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||21||
पोट शूळाने त्रस्त झालेल्या ब्राह्मणाला वाचवलेस .ब्राम्हण श्रेष्ठीचा त्वरित उद्धार केलास
करे केम ना मारो व्हार
जो आणि गम एकज वार ||22||
असा तू माझ्या मदतीला का येत नाहीस ,हे प्रभू ये आणि माझ्याकडे एकदाच पहा
शुष्क काष्ठणे आंण्या पत्र
थयो केम उदासिन अत्र ||23||
तू सुकलेल्या काष्टाला पाने आणलीस ,मग मज बाबातुत का उदास झाला आहेस
जर्जर वन्ध्या केरां स्वप्न
कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||24||
तू म्हाताऱ्या वांज स्त्रीचे स्वप्न पुरे केलेस तिला पुत्र रत्न प्रदान करून सफळ केलेस
करि दुर ब्राम्हणनो कोढ
किधा पुरण एना कोड ||25||
तू ब्राह्मणाचे कुष्ट दूर केलस .तर मग माझा हट्ट का पुरा करीत नाहीस
वन्ध्या भैंस दुझवी देव
हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||26||
तू वांझ म्हशीला दुध आणलेस .त्यांचे दारिद्र क्षणात घालवलेस
झालर खायि रिझयो एम
दिधो सुवर्ण घट सप्रेम ||27||
भिक्षेतील घेवडा खावून प्रसन्न झालास अन त्या बदली त्यांना सुवर्ण भरलेला घडा दिलास
ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार
किधो संजीवन ते निर्धार ||28||
तू ब्राम्हण स्त्रीचा मेलेला पती तिची भक्ती व निर्धार पाहून पुन्हा जिवंत केलास
पिशाच पिडा किधी दूर
विप्रपुत्र उठाड्यो शुर ||29||
तू पिशाच बाधा नष्ट करून ब्राह्मणाचा पुत्र जिवंत केलास आ तू पराक्रमी आहेस
हरि विप्र मज अंत्यज हाथ
रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||30||
तू गर्विष्ठ ब्राह्मणाचा गर्व अंतजाकडून उतरविला आणि आपला भक्त त्रिविक्रम याचे रक्षण केलेस
निमेष मात्रे तंतुक एक
पहोच्याडो श्री शैल देख ||31||
एका क्षणार्धात विणकराला श्री शैल पर्वतावर पोहचवलेस
एकि साथे आठ स्वरूप
धरि देव बहुरूप अरूप ||32||
एकाच वेळी आठ रूपे घेतलीस,देवा असा तू बहूरूप धरूनही पुन्हा अरूप आहेस
संतोष्या निज भक्त सुजात
आपि परचाओ साक्षात ||33||
तू आपली भक्तांना संतोष देतोस त्यांना साक्षात प्रचिती देतोस
यवनराजनि टाळी पीड
जातपातनि तने न चीड ||34||
तू यवन राजाची पिडा जो कोड होता तो नष्ट केलास .तुला जातपातीशी काही देणे घेणे नसते
रामकृष्णरुपे ते एम
किधि लिलाओ कई तेम ||35||
राम कृष्ण ही तुझीच रूपे आहेत .या रूपांनी तूच तूच सर्व लीला केली आहेस
तार्या पत्थर गणिका व्याध
पशुपंखिपण तुजने साध ||36||
तू दगड वेश्या पारधी यांचा उद्धार केलास ,पशु पक्षी सुद्धा तुला साद घालतात (अन तू त्यांना प्रतिसाद देतास)
अधम ओधारण तारु नाम
गात सरे न शा शा काम ||37||
तुझे नाम स्मरण केल्याने अधमांचा उद्धार होतो, ते म्हटल्याने कुठले काम होत नाही?
आधि व्याधि उपाधि सर्व
टळे स्मरणमात्रथी शर्व ||38||
सर्व प्रकारची आधी व्याधी उपाधी तुझ्या स्मरण मात्रेची पूर्णत:नष्ट होतात
मुठ चोट ना लागे जाण
पामे नर स्मरणे निर्वाण ||39||
तसेच कुणी केलेली मुठबाधा करणी लागत नाही तव स्मरणे नराला निर्वाण प्राप्त होते
डाकण शाकण भेंसासुर
भुत पिशाचो जंद असुर ||40||
डाकीनी शाकीनी म्हसोबा भूत पिशाच्च जिंद असुर ..ही सर्व भूत सृष्टी
नासे मुठी दईने तुर्त
दत्त धुन सांभाळता मुर्त ||41||
दत्त नामची धून पाहताच ऐकताच मुष्टी आवळून पळत सुटतात
करी धूप गाये जे एम
दत्तबावनि आ सप्रेम ||42||
जो कूणी धुप करून अत्यंत प्रेमाने ही दत्त बावनी गाईन
सुधरे तेणा बन्ने लोक
रहे न तेने क्यांये शोक ||43||
त्याचे इह परलोक मार्गी लागतील अन त्याला शोकास काही कारण उरणार नाही
दासि सिद्धि तेनि थाय
दुःख दारिद्र्य तेना जाय ||44||
सर्व सिद्धी त्याच्या दासी होतील अन त्याचे दुख दारिद्र नष्ट होईल
बावन गुरुवारे नित नेम
करे पाठ बावन सप्रेम ||45||
जो कुणी बावन गुरुवार नियमितपणे प्रेमाने हा पाठ करेल
यथावकाशे नित्य नियम
तेणे कधि ना दंडे यम ||46||
शांत सावकाशपणे नित्य नियमाने केलेल्या पाठामुळे त्याला यमदंडाची भीती राहणार नाही
अनेक रुपे एज अभंग
भजता नडे न माया रंग ||47||
अनेक रुपात अनेक प्रकारे या अभंगाने प्रभूला जो भजतो त्याला माया कधीच त्रास देत नाही
सहस्त्र नामे नामि एक
दत्त दिगंबर असंग छेक ||48||
त्याला सहस्त्र नावे असली तरी तो नामी एकच आहे. अन तो हा केवळ एकच असंग(नाम गोत्र विवर्जित) दत्त दिगंबर आहे
वंदु तुजने वारंवार
वेद श्वास तारा निर्धार ||49||
हे प्रभू तुला मी वारंवार वंदन करतो वेद श्वास हे निश्चितपणे तुझा श्वास आहेत
थाके वर्णवतां ज्यां शेष
कोण रांक हुं बहुकृत वेष ||50||
ज्याचे वर्णन करतांना सहस्त्र मुखी शेष थकून जातो तर मी विविध रुपात नटूनही त्या पुढे केवढा बापुडा आहे
अनुभव तृप्तिनो उद्गार
सुणि हंशे ते खाशे मार ||51||
हे माझे अनुभव तृप्त उद्गार आहेत जो कुणी याची टवाळी करत हसेल त्याला जरूर मार पडेल शिक्षा मिळेल
तपसि तत्वमसि ए देव
बोलो जय जय श्री गुरुदेव ||52||
तपस्येने प्राप्त होणारा हा देव असून तत्वमसी हेच त्याचे खरे स्वरूप आहे म्हणून सारेजण त्याचा जयजयकार करुयात, म्हणा जय जय श्री गुरुदेव .
|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
स्वैर अनुवादक
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://namsmarandhyan.blogspot.in/
No comments:
Post a Comment