ध्यान का करायचे ?असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.पण मुळात ध्यान करता येत नाही ती करायची गोष्ट नाही .पण त्यासाठी बसता मात्र येते .तर ध्यानासाठी का बसायचे? याची अनेक उत्तरे आहेत.कुणाला मानसिक शांती ,कुणाला तणावापासून मुक्ती,कुणाला मनाची शक्ती वाढवणे,तर कुणाला इतरांना दाखवण्यासाठी ध्यान करायचे असते
पण सर्व धर्म पंथ यांना ठामपणे माहित आहे कि स्वरूप जाणायला ,देव कळायला ,आत्म साक्षात्कार व्हायला ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही.किंबहुना यासाठीच ध्यान आहे.आपण कोण आहोत हे कळणे ज्याला महत्वाचे वाटते तो मुमुक्षु, आणि अश्या व्यक्तीलाच ध्यानात गोडी वाटते .अन्यथा या मार्गावर उत्सुकतेने जाणारे हे त्या विंडो शॉपिंग करणाऱ्या मुर्खासारखे आहेत,केवळ वेळ वाया घालवणारे.अशी गोडी नसेल तर उगाचच इथे येऊ नये .त्याने धन गोळा करावे .सुखाने संसार करावा.त्यात काही पाप नाही, कमीपणा नाही .
मात्र जीवनात खरी शांती,समाधान,आनंद यांच्या शोधत निघालेला वाटसरू एक दिवस ध्यानाच्या मुक्कामाला येणारच यात संशय नाही.
(क्रमशः)
विप्र
No comments:
Post a Comment